D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • NSS volunteers, NCC cadets of our D.R.K. College of Commerce participated in the flood rescue camp at Dairsheel Hall, Tarabai Park, Kolhapur

    गेले काही दिवस आपण सर्वजन एका आस्मानी संकटाला झेलतोय... महापूर.. हे त्या संकटाचे नाव. कोल्हापूरच्या इतिहासात असा मोठा महापूर झाला नाही. एका रात्रीत गावेच्या गावे पाण्याखाली बुडली, घरेदारे उध्वस्त झाली ... जनावरे मेली ... शेती पाण्याखाली बुडाली .. डोक्यावरच छत उध्वस्त झाले ... काडी काडी जोडून उभारलेला संसार डोळ्यादेखत वाहुन गेला ... क्षणात होत्याच नव्हत झाल ... पण माणुसकीने पुढे केलेल्या हातांनी कीत्येकांचे जीव वाचले... जनावरांना कुवतीप्रमाणे दाना पाणी मिळाला ... हजारो कुटुंबांना , लाखो जीवांना पुन्हा उभ करण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे ...हे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या *देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, मधिल राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी चपाती-भाजी तयार करून पूरग्रस्तांसाठी मदत कार्यात मग्न ....