D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व देशभक्त रात्न्नाप्पा कुंभार कॉलेज आणि कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न.

    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व देशभक्त रात्न्नाप्पा कुंभार कॉलेज आणि कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न.

    उद्घाटनप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. विलास नादवडेकर, कौन्सिल ऑफ एजुकेशनच्या अधाक्ष्या सौ. रजनीताई मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, अॅड. व्ही. एन. पाटील,  अॅड. वैभव पेडणेकर, श्री. नितीन दळवाई तसेच ऑलीपिक खेळाडू वीरधवल खाडे उपस्थित होते. दि. ५ जुलै २०२० रोजीच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ. संदीप देवल यांनी “सर्वासाठी आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती” आणि डॉ. गॉर्डना मार्कोविक- सर्बिया यांनी “स्त्रियांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती” या विषयावर विस्तृत विवेचन केले. दि. ६ जुलै २०२० रोजीच्या पहिल्या सत्रामध्ये मि. युनिव्हर्स संग्राम चौगुले यांनी “आहार व पोषण मूल्य” आणि डॉ. ब्रान्को सिसिक - सर्बिया यांनी “वैयक्तिक आणि सामुहिक आरोग्यासाठी ध्यानधारणा” या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वेबिनार मधील सहभागी व्यक्तींच्या प्रश्न आणि शंकांचे निरसन केले. सांगता समारंभ देशभक्त रात्न्नाप्पा कुंभार कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, प्र. संचालक शिवाजी विद्यापीठ- डॉ. पी.टी गायकवाड, कौन्सिल ऑफ एजुकेशनचे सदस्य डॉ. विश्वनाथ मगदूम, अॅड. व्ही. एन. पाटील कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री. नितीन दळवाई यांच्या संबोधनाने पार पडला. वेबिनार यशस्वी होण्यासाठी समन्वयक डॉ. शरद बनसोडे, डॉ.अशोक बन्ने, श्री. सुचय खोपडे, डॉ.के.जी. कांबळे, डॉ.एन. एच. जाधव, श्री. विनायक साळोखे , डॉ. अतुल जाधव, डॉ. टी. एस. झारी, डॉ.वर्षा रायनाडे, डॉ.सुष्मा चौगुले, सौ. टी.ए. हिलगे, श्री. प्रवीण साळवी इ. नी प्रयत्न केले.