D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दे.भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न.

    दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षक पालक सहविचार सभा संपन्न.

                   इयत्ता बारावी - शिक्षक पालक सहविचार सभेचे दे. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले. “मुलांना समजून घेऊन मार्गदर्शन करावे व त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करावे" असे प्रतिपादन डॉ. श्री. व्ही. एन. शिंदे, प्रभारी कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षक पालक सहविचार सभेमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील सर होते. कोरोना काळात मुलांची बदललेली मानसिकता व ती समजून घेताना पालकांनी घ्यावयाची भूमिका याविषयी ते बोलत होते. “शिक्षकांनी मुलांच्या कलागुणांना ओळखून वाव देणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे" असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी सभेमध्ये मांडले. या सभेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बी. टी. नाईक व ज्युनिअर विभाग पर्यवेक्षक श्री. बी. डी. डवंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका सौ. ए. व्ही. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक श्री. आर. एम. कुंभार यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. एम. पी. वंडकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. जी. एन. धुमाळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.