D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये रास दांडिया चा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

    शनिवार दिनांक १/१०/२०२२ रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये रास दांडिया चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये 300 हून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम दोन सत्रात पार पडला.मुलींचा कार्यक्रम ११.३० ते २.०० तर मुलांचा कार्यक्रम २.३० ते ५.०० या वेळेत घेण्यात आला. कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ.व्हीं.ए.पाटील व ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा.बी.डी डवंग उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सौ टि.एस.नार्वेकर यांनी केली. या कार्यक्रमासाठी सर्व ज्युनिअर स्टाफ उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील विद्यार्थ्यांनी विशेष कष्ट घेतले शिवेंद्र माने, ओम राजे व रितेश जठार.