D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर मध्ये दीपावली निमित्त उद्योजकता विकासाचे 'मेगा ट्रेड फेयर' आयोजित करण्यात आले.

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर मध्ये दीपावली निमित्त उद्योजकता विकासाचे 'मेगा ट्रेड फेयर' आयोजित करण्यात आले .यामध्ये विद्यार्थ्यांनी फूड स्टॉल, दिवाळी उत्पादने ,फनी गेम्स चे आयोजन केले होते.
    कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. ए .पाटील सर, उपप्राचार्य डॉ .बी .टी. नाईक सर ,पर्यवेक्षक प्रा. बी.डी .डवंग सर व संयोजिका प्रा .टी .एस. चौगले मॅडम यांनी केले.
    कार्यक्रमाची सुरुवात देशभक्त रत्नाप्पा अण्णांच्या प्रतिमेचे पूजन व झाडास पाणी घालून करण्यात आले.
    विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करून स्टॉल सजविले होते. दिवाळीसाठी आवश्यक अशा सुबक कलाकृती असणाऱ्या पणत्या, आकाश कंदील ,फ्लॉवर पॉट ,फ्रेम, विणकाम असणारे विविध प्रकारचे कपडे ,भेटवस्तू इत्यादी असंख्य प्रकारच्या वस्तूंचे जणू दालनच उभारले गेले होते .खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा पाणीपुरी ,भेळ, सँडविच ,केक्स ,पेस्ट्री, इडली सांबर ,ज्यूस असे विविध पदार्थ होते. विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन सुद्धा केले होते. यातून विद्यार्थ्यांना विक्रीचा मनमुराद आनंद घेता आला.
    अशारितीने भरपूर उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी या मेगा ट्रेड फेयरला उदंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,विद्यार्थी व विद्यार्थिनीनी विशेष सहभाग नोंदविला.