D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • "शिक्षक - पालक सुसंवाद विद्यार्थ्यांच्या जीवनात चमत्कार घडवेल" डॉ.बी एम हिर्डेकर ...

    शिक्षक पालक सहविचार सभेचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.  त्या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुलांचे शिक्षण हे पालकांचे प्राधान्य असावे तसेच त्यांना मोठी स्वप्ने बघण्यास  प्रवृत्त केले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. बी. एम. हिर्डेकर (माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर माजी कुलसचिव संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर) यांनी केले. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर न लादता त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी त्यांनी कॉन्शियस  पॅरेंटिंग चे महत्व तसेच हेलिकॉप्टर पॅरेंटिंग चे दुष्परिणाम विशद केले.  Every child is special हा महत्त्वाचा संदेश ही त्यांनी आपल्या भाषणांमधून पालकांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही ए पाटील होते. अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी विद्यार्थी दशे मधील महाविद्यालयाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालया मार्फत चालवले जाणारे विविध उपक्रम याविषयी माहिती दिली. ज्युनियर विभाग प्रमुख श्री. बी. डी. डवंग यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाची शिस्त तसेच पौगांडा अवस्थेतील मुलांची बदललेली मानसिकता व ती समजून घेताना पालकांनी घ्यावयाची भूमिका याविषयी आपले मत व्यक्त केले. प्रा. सौ.टी.एस.चौगुले यांनी परीक्षा व मूल्यमापन पद्धती याविषयी पालकांना माहिती दिली.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ.ए. व्ही.पाटील यांनी केले प्रा. आर.एम.कुंभार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ जी एन धुमाळ व प्रा. श्री एम. पी.  वंडकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.