D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पा कुंभार यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

    दि. २३/१२/२०२२ थोर देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांना उजाळा देण्यासाठी दे. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर महाविद्यालयामध्ये अण्णांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
    कार्यक्रमाची सुरवात रॅलीने करण्यात आली. यामध्ये NSS व NCC च्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदविला. सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी “खरच आपण पारतंत्र्यात जात आहोत का?" या शिर्षकाचे पथनाटय सादर केले. तसेच स्मृतिदिनानिमित्त रांगोळी व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या  हस्ते पारितोषीक देण्यात आले.
    या कार्यक्रमाला कौन्सिल ऑफ एज्यूकेशनचे सेक्रेटरी डॉ. विश्वनाथ मगदूम, कौन्सिल सदस्य अँड.अमित बाडकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. बी. टी. नाईक, नाइट कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. फराकटे, डॉ. बनसोडे, ज्यूनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. बी. डी. डवंग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आर. एम. कुंभार यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. बी. डी. डवंग यांनी केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. ए. एस. मगदूम यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.