दे .भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत या वर्षीही 12 वी चा निकाल 98.73% व एम. सी. व्ही. सी. विभागा चा निकाल 100% लागला. वाणिज्य शाखेत कु. कोकाटे बलभीम प्रकाश याने 94.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला . तसेच कु. बारटक्के अनुश्री कीसन व मगदुम श्रुती सुरेश यांनी अनुक्रमे 94.00% आणि 94.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. केस्तीकर सुरभी समीर हिने 93.67% गुण मिळून तृतीय क्रमांक मिळविला. गडकरी त्रिषला सचिन व मगदुम श्रुती सुरेश या विद्यार्थींनीनी माहिती तंत्रज्ञान या विषया मध्ये 100 पैकी 100, चौगले अर्थव अरविंद व भोगावकर मधु विजय यांनी बुक किंपीग व अकौंन्टसी या विषया मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले.
महाविद्यालयातील एम. सी. व्ही. सी. विभागामध्ये कु. साळोखे स्नेहा सुरेश हिने 88.33% गुण मिळवुन प्रथम क्रमांक प्राप्त केला. कु. दळवी प्रणीता रमेश हिने 87.50% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक प्राप्त केला व कु. सुभेदार मसीरा मुबारक हिने 86.00% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
महाविद्यालयात एकूण 26 विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा जास्त गुण मिळवून उज्वल यशाची परंपरा कायम राखली . यशस्वी विध्यार्थ्यांना कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. व्ही. एन .मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर तसेच प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, पर्यवेक्षक श्री. बी .डी. डवंग व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले.