D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न.

                     आपल्या ठाई असलेल्या अज्ञानाचा नाश करून ज्ञानाच्या दीपाला प्रकाशित करणाऱ्या गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आषाढी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, (व्यास पौर्णिमा) या दिवशी आपल्या गुरूंचे स्मरण आणि पूजन केले जाते.याचेच औचित्य साधून डी. आर.के. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांद्वारा आखण्यात आली होती. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन अकरावी व बारावीच्या  विद्यार्थ्यांनी सौ. टी. एस. नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य कॅप्टन डॉ.आर. एस. नाईक होते. "जीवन जगत असताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक गुरु आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवत असतात आणि आपल्या आयुष्याला आकार देतात" अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  ज्युनियर विभाग प्रमुख श्री.  बी. डी.डवंग यांनी "आई शिवाय माया नाही आणि गुरु शिवाय विद्या नाही" योग्य वयात योग्य ते संस्कार होण्यासाठी , ज्ञान मिळवून जीवन समृद्ध होण्यासाठी गुरु आणि गुरुचे मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं असतं. अशा शब्दात त्यांनी गुरुचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली तसेच गुरुजनांचे पाद्यपूजन करून छानशी भेटवस्तू देण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी भाषण, नाटक ,नृत्य ,गायन इत्यादी वेगवेगळे  कार्यक्रम सादर करून  उपस्थितांची  मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रेवती पाटील व कु. सलोनी कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आदिती राबाडे हिने मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.