अकरावी मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांना महाविद्यालयाची तसेच महाविद्यालयात घेतले जाणारे विविध उपक्रम इत्यादींची सविस्तर माहिती व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सेक्रेटरी डॉ. विश्वनाथ मगदूम होते. मुलांनी सर्वांगीण विकासासाठी सोशल मीडियाचा अति वापर न करता आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात व्यतीत करून त्यांनी स्वतःचा व त्याचबरोबर समाजाचा विकास केला पाहिजे असा मोलाचा संदेश त्यांनी आपल्या भाषणात दिला. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. आर एस नाईक यांनी केली. प्रा. एस. एस. पवार व प्रा सौ.टी. एस .चौगुले यांनी पी.पी.टी.द्वारे मुलांना महाविद्यालयाची सविस्तर माहिती दिली. पी.पी.टी. बनवणे व ती मुलांच्या पर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आयटी विभाग प्रमुख प्रा. एस. एस.पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ ए.एस. मगदूम यांनी केले व आभार प्रदर्शन ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. श्री डवंग यांनी केले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
12 Mar, 2025
10 Mar, 2025
08 Mar, 2025
06 Mar, 2025
05 Mar, 2025