D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • क्रांती दिन म्हणजे युवकांना चेतना देणारा दिवस: रजनीताई मगदूम

                           देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागांच्या वतीने क्रांती दिनानिमित्त रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबोधित करताना कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्ष सौ. रजनीताई मगदूम म्हणाल्या की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानामुळे नवीन पिढीमध्ये नवीन पिढीमध्ये ऊर्जा निर्माण होते.  क्रांतिकारकापासून प्रेरणा घेऊन  युवकांनी देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे असे त्या म्हणाल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ.आर. एस. नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या रॅलीसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रासीयो कार्यक्रमाधिकारी डॉ. ए.एस. बन्ने, प्रा. प्रकुल पाटील - मांगोरे , प्रा. बाबासाहेब कश्यप, प्रा. प्रवीण सोरटे, प्रा. सीमा बेनाडे, प्रा. सौ. जमदाडे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.