कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस शालेय स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील मुले या गटामध्ये आपल्या जुनियर कॉलेजमधील चैतन्य ठाणेदार याने द्वितीय क्रमांक पटकावला तर श्रेयश चौगुले यांनी तृतीय क्रमांक पटकावून दोघांचीही विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
विजय खेळाडूंना संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड . वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक प्रकुल पाटील-मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.