D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सकारात्मक परिणाम- डॉ. व्ही. एन. मगदूम

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना डॉ. मगदूम यांनी विद्यार्थी जीवनात प्रार्थनेचे महत्त्व विषद केले तसेच आयुष्य घडविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या स्वयं सूचनेचे पठण ही उपस्थित विद्यार्थ्यांकडून करून घेतले. आपल्या भाषणादरम्यान डॉ. मगदूम यांनी "प्रार्थनेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य सकारात्मक परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती होते". असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी केले. विधि विभाग प्रमुख डॉ. एस. एस. देसाई यांनी आभार मानले यावेळी डॉ. के. जी. कांबळे, डॉ. ए.एस.बन्ने, डॉ. एन. एच. जाधव डॉ. एस. ए. चौगुले, डॉ. बोथीकर इतर प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.