* देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजच्या शास्त्र शाखेमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील*
🔸कोल्हापूर : “देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेबरोबरच नवीन शिक्षण धोरणानुसार शास्त्र शाखेची सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार शास्त्र शाखेचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. विज्ञान शाखेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि इतर भौतिक सुविधा यांचे उद्घाटन माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले
🔸 कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या शास्त्र शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नामदार पाटील बोलत होते.
🔸या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम उपस्थित होत्या.
🔸आपल्या मनोगतात नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, “नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, नवोन्मेषी व संशोधनाभिमुख बनवणारे आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सक्षम करणे, हेच या धोरणाचे वैशिष्ट्य आहे.या नवीन शिक्षण धोरणात सर्व विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण एकाच वेळी घेता येऊ शकते. यामुळे देशातील युवाशक्ती अधिक सक्षम होऊन भारताच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीस गती मिळेल आणि त्याचाच एक भाग म्हणजे कॉमर्स कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेबरोबरच शास्त्र शाखेच्या शिक्षणाची सुरुवात होय. ”
🔸अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. रजनीताई मगदूम म्हणाल्या, “कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सातत्याने होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शास्त्र शाखेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक शाखांमध्ये प्रगतीची नवी दारे खुली होतील.”
🔸प्रास्ताविकात कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना म्हणाले की, “संस्थेमार्फत शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रवाह राबवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. त्याचाच भाग म्हणून कॉमर्स कॉलेजमध्ये शास्त्र शाखा आणि नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये ‘बी.ए. इन योगा आणि जर्मन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आज शास्त्र शाखेच्या उद्घाटनामुळे संस्थेच्या प्रगतीत आणखी एक मोलाची भर पडली आहे.”
🔸या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे संशोधनातील नवीन प्रवाह व डॉ. खंडागळे यांचे अध्यापनातील नाविन्यपूर्ण पद्धती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
🔸कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. अरुण शिंदे व डॉ. राज बिरजे यांनी केले.
🔸कार्यक्रमास कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रसाद मगदूम सदस्य ॲड अमित बाडकर, ॲड. वैभव पेडणेकर, पूजा पाटील शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, पार्वती कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. भालचंद्र कुलकर्णी, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील, तसेच विविध मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि रत्नापाण्णा कुंभार यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.