विशेष श्रमसंस्कार शिबिर
कालावधी: 06 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026
आयोजक: राष्ट्रीय सेवा योजना (NSS)
महाविद्यालय: देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
स्थळ: कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर
प्रास्ताविक
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक 06 जानेवारी 2026 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत कसबा सांगाव येथे करण्यात आले. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमसंस्कार, नेतृत्वगुण आणि ग्रामविकासाची भावना निर्माण करणे हा होता.
उद्घाटन समारंभ (06.01.2026)
शिबिराचे उद्घाटन कसबा सांगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वीरश्री जाधव व उपसरपंच सौ. रेखा आवळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वर्षा मैंदर्गी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सरपंच सौ. वीरश्री जाधव यांनी अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत व्यक्त केले.दादासाहेब मगदूम हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे चेअरमन डॉ. सुनील मिरजे यांनी शिबिरार्थींचे स्वागत केले.यावेळी श्री किरण पास्ते, श्री अमोल माळी, डी. एम. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा पाटील, माजी उपसरपंच विक्रमसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक बन्ने, डॉ. संतोष गवई, प्रा. कुबेर दिंडे, सौ. एम. एस. वाडकर, सौ. एस. एस. सांगरूळकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिवस दुसरा (07.01.2026)
गट क्रमांक 1 च्या नेतृत्वाखाली दिवसाची सुरुवात व्यायामाने झाली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 1 मध्ये माजी उपसरपंच श्री विक्रमसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी “चला संविधान समजून घेऊया” या विषयावर प्राचार्य सुनील स्वामी (रत्नदीप हायस्कूल व ज्यु. कॉलेज, कबनूर) यांचे प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री अमर कांबळे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच सौ. वीरश्री जाधव, सौ. रेखा आवळे, सौ. गीतांजली विभुते, श्री लोखंडे व श्री विक्रमसिंह जाधव होते.
दिवस तिसरा (08.01.2026)
गट क्रमांक 5 च्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी सकाळी चंद्रकांत नर्सरी (फुले व भाजीपाला उद्योग) येथे शैक्षणिक भेट दिली. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 2 मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सायंकाळी “पर्यावरण संरक्षण : आपली जबाबदारी” या विषयावर प्रा. माणिक पाटील (देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स) यांचे व्याख्यान झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री सुदर्शन मजले होते.
दिवस चौथा (09.01.2026)
गट क्रमांक 3 च्या नेतृत्वाखाली कसबा सांगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व वॉर्ड क्रमांक 3 येथे स्वच्छता मोहीम राबवली. सायंकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर यांच्या वतीने “अंधश्रद्धेची दुनिया – चमत्काराची किमया” ही नाटिका सादर करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जनजागृती करण्यात आली.
दिवस पाचवा (10.01.2026)
गट क्रमांक 4 च्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक 6 येथे स्वच्छता उपक्रम राबवला. सायंकाळी “ऑनलाइन फसवणूक आणि आपण” या विषयावर प्रा. कु. के. एस. पोळ (विभागप्रमुख, BCA, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण माळी होते. उपस्थितीत सरपंच सौ. वीरश्री जाधव व श्री विक्रमसिंह जाधव होते.
दिवस सहावा (11.01.2026)
गट क्रमांक 5 च्या नेतृत्वाखाली सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सायंकाळी शाळेच्या प्रांगणात श्री विक्रम उरणकर (मुंबई) यांचे “व्यक्तिमत्व विकास” या विषयावर व्याख्यान झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम होते. प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्या सौ. पुष्पा पाटील व प्राचार्य सुनील स्वामी होते.त्यानंतर कसबा सांगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मैदानावर “विकसित भारत आणि आजचा युवक” या विषयावर डॉ. चांगदेव बंडगर (डिस्टन्स अँड ऑनलाइन एज्युकेशन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य श्री दीपक बाळासाहेब हेगडे होते.
दिवस सातवा व समारोप (12.01.2026)
शेवटच्या दिवशी स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दादासाहेब मगदूम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात प्राचार्या सौ. पुष्पा पाटील यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यानंतर स्वयंसेवकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. वीरश्री जाधव व प्राचार्या सौ. पुष्पा पाटील होत्या. शिक्षक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप झाला.
सदर विशेष श्रमसंस्कार शिबिरामधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा, नेतृत्वगुण व सामूहिक कार्याची जाणीव दृढ झाली. ग्रामविकासात सहभाग घेत विद्यार्थ्यांना समाजाभिमुख शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. हे शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरले.
Camp report upload
VID-20260108-WA0076
VID-20260108-WA0129(1)
VID-20260108-WA0129
VID-20260109-WA0019
VID-20260110-WA0008
VID-20260111-WA0078
VID-20260111-WA0083
VID-20260111-WA0092
VID-20260113-WA0018
VID-20260113-WA0019
VID-20260113-WA0078
VID-20260113-WA0082
VID-20260113-WA0108
VID 20260107 062329
VID 20260111 114823