D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • सोळावा राष्ट्रीय मतदार दिन 25. 01. 2025.

    महाविद्यालयामध्ये दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी सोळावा राष्ट्रीय मतदार दिन My India My Vote  या अंतर्गत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थिताना संबोधित करताना  प्राचार्या डॉ.मैंदर्गी  करताना सांगितले की मतदान करणे हा आपला हक्क आणि कर्तव्य असून सर्वांनी मतदान तर केलेच पाहिजे शिवाय योग्य उमेदवाराची निवड करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. (सौ.) वर्षा मैंदर्गी, उपप्राचार्य डॉ. आर एस नाईक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक बन्ने, डॉ. संतोष गवई, प्रा. कुबेर दिंडे इतर शिक्षक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    याबरोबरच दिनांक 24 जानेवारी 2026 च्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांकडून घोषवाक्ये  लिहून  घेण्यात आली. 

    24 1 Nat voters day oath & slogan report