देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निसर्ग प्रल्हाद सावंत याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या ठिकाणी 17 जानेवारी 2026 ते 24 जानेवारी 2026 आयोजित राज्यस्तरीय आव्हान शिबिरामध्ये सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक (पुरुष) पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिबिरामध्ये अभिषेक व्हनकांबळे, कु. आकांक्षा गुरव यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. या स्वयंसेवकांना कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर ॲड. अमित बाडकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ वर्षा मैंदर्गी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक बन्ने, डॉ. संतोष गवई, प्रा. कुबेर दिंडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
report