D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • भविष्यातील यशस्वी व्यवस्थापक आणि उद्योजकांसाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, एम. बी. ए. विभागातर्फे 'एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया २०२६' कार्यशाळा उत्साहात संपन्न*

    व्यवस्थापन शिक्षणाचा दैदीप्यमान इतिहास असणाऱ्या कोल्हापुरातील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एम.बी.ए. विभागाच्या वतीने,  बी. कॉम., बी.बी.ए., बी.ए. आणि बी.एससी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी "एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया २०२६-२७" या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ​कार्यशाळेचे उद्घाटन आणि बीजभाषण
    ​ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा व्ही. मैंदर्गी यांच्या हस्ते झाले. बीजभाषण करताना त्यांनी एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवीचे जागतिक स्तरावरील महत्त्व अधोरेखित केले.  ​"एम.बी.ए. केवळ एक पदवी नसून तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कायापालट करणारा प्रवास आहे. भविष्यात यशस्वी व्यवस्थापक बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वासाची कास धरणे आवश्यक आहे.  आपल्या महाविद्यालयातील एम. बी ए. विभाग अथक आणि अविरतपणे विद्यार्थ्यांचे आयुष्य आणि भविष्य उत्तम नाही तर सर्वोत्तम व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा" असे प्रतिपादन डॉ. मैंदर्गी यांनी यावेळी केले. ​कार्यशाळेत  विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तांत्रिक बाबींपासून ते प्रत्यक्ष तयारीपर्यंत सखोल मार्गदर्शन करण्यात आले:
    ​ एम.बी.ए. विभागाचे प्र. संचालक डॉ. ताहीर स. झारी यांनी एम.बी.ए. सीईटी (CET) परीक्षेचा बदलता आराखडा, वेळेचे व्यवस्थापन, तर्कशक्ती (Logic) आणि गणितीय क्षमता विकसित करण्याच्या प्रभावी पद्धती सांगितल्या.
    ​प्रसिद्ध जनरल अटीट्यूड मेंटॉर ( CET Exam) श्री. हनुमंत गनगे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील कठीण प्रश्नांची उत्तरे कमी वेळात कशी द्यावीत, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. ग्रंथपाल डॉ. टी. एल. कांबळे यांनी परीक्षेच्या तयारीसाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या अद्ययावत संदर्भ पुस्तकांविषयी आणि डिजिटल संसाधनांविषयी माहिती दिली. ​तसेच एम.बी.ए. विभागातर्फे इच्छुक विद्यार्थ्यांचे प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया देखील राबवण्यात आली, ज्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली.
    ​या उपक्रमास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद विश्वनाथ मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम तसेच ॲड. वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
    ​याप्रसंगी प्रा. बी. ए. कश्यप, प्रा. के. एस. पोळ यांच्यासह एम.बी.ए. विभागातील प्रा. डॉ. टी. ए. हिलगे, प्रा. माणिक पाटील, प्रा. सौ. पी. ए. वाघमारे, प्रा. रोनित खराडे, प्रा. एस. पी. मिसाळ आणि श्री. शिवम अडगुळे, श्री निलेश नीलवर्णी, श्री अभिजीत माने यांनी संयोजन केले.