D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा 19.02.2026

    कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा 19.02.2026
     देशभक्त देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली. स्वयंसेवकांनी सकाळी आठ वाजता शिवजयंती नमित्त पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यानंतर शिवज्योत मिरवणूक हालगीच्या सुरात काढण्यात आली. शिवज्योतीचे स्वागत महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. (डॉ) सौ. वर्षा मैदर्गी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ बन्ने अशोक, डॉ. संतोष गवई यांनी केले.  स्वयंसेविका कुमारी प्रियांका भारद्वाज हिने महाविद्यालयास भेट दिलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींनी शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा गायन केले. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मता शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करून आलेल्या यश पोवार या स्वयंसेवकाचा सत्कार    मा. प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. 
    यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये स्वयंसेवकांनी लेझीम, लाठी काठी आणि तलवार या मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करून दाखविली.
     
     
                 

    19 2 shivjayanti report