D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम 23 फेब्रुवारी 2026

    राष्ट्रसंत स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले.या उपक्रमांतर्गत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, श्रमसंस्कार व समाजप्रबोधनाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करत संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा संदेश दिला.<या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने, डॉ. संतोष गवई, प्रा. कुबेर दिंडे, रजिस्ट्रार श्री मोहन पोवार व शिपाई श्री संजय लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

    23 2 cleaning colleg sant gadage baba report