दिनांक 12 मार्च 2026 रोजी पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या वतीने जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने आयोजित रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव मा. डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वर्षा मंदर्गी आणि उपवप्राचार्य डॉ. रवीकुमार नाईक यांच्या उपस्थितीमध्ये झाले. रॅली महाविद्यालयातील सुरू होऊन बिंदू चौक, महानगरपालिका, सीपीआर हॉस्पिटल, दसरा चौक मार्गे पुन्हा महाविद्यालयात येऊन त्याची सांगता झाली. रॅली नंतर कोल्हापूर शहरातील सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा लाभ स्वयंसेवकांबरोबरच सर्व उपस्थित त्यांनी घेतला. डॉ. मगदूम यांनी किडनी हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असून किडनीची काळजी कशा पद्धतीने घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला नाईट कॉलेज प्राचार्य डॉ. उत्तम पाटील उपवप्राचार्य डॉ. सुरेश फराकटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधकारी डॉ. अशोक बन्ने, प्रा. कुबेर दिंडे, डॉ. संतोष गवई यांच्यासह तिन्ही कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
12 3 world Kidney Day report
07 Aug, 2026
03 Aug, 2026
02 Aug, 2026
30 Jul, 2026
29 Jul, 2026