जागतिक वन दिन व जागतिक जलदिनानिमित्त कौन्सिल ऑफ एज्युकेशन, देशभक्त रत्नाप्पा कुंभार मेमोरियल ट्रस्ट आणि पाटलोबा पाटील बांबू रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित बांबू उद्योग परिषद व प्रदर्शन आणि वने दिंडीमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा स्वयंसेवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. दिनांक 21 मार्च 2026 रोजी सकाळी आठ वाजता वने दिंडीची सुरुवात हलगी आणि लेझीमच्या तालावर महाविद्यालयातून सुरू झाली. बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दसरा चौक मार्गे शहाजी लॉ कॉलेज या ठिकाणी दिंडीची सांगता झाली. यावेळी स्वयंसेवकांनी पारंपारिक वेशभूषेमध्ये लेझीम आणि लाठी -काटीची प्रात्यक्षिके सादर केली. या उपक्रमाला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्ष सौ रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, ॲड. वैभव पेडणेकर एडवोकेट अमित बाडकर, उपप्राचार्य डॉक्टर आर एस नाईक प्राध्यापक दिंडे डॉक्टर संतोष गवई इत्यादी उपस्थित होते.
21 3 Int Day of Forest World Water Day report VID-20260321-WA0029 VID-20260321-WA0030
05 Sep, 2026
03 Sep, 2026
02 Sep, 2026
29 Aug, 2026
28 Aug, 2026
26 Aug, 2026