आयोजक : एम.बी.ए. विभाग, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथील एमबीए विभागाच्या वतीने शनिवार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी Shimpukade Metallguss Pvt. Ltd., 5-स्टार एम.आय.डी.सी., कागल येथे औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यपद्धतीची माहिती करून देणे, उद्योग व्यवस्थापनातील विविध पैलू समजावून सांगणे आणि सैद्धांतिक ज्ञानासोबतच औद्योगिक अनुभव प्रदान करणे हा होता.
एम.बी.ए. भाग–II मधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने व सक्रिय सहभागाने या भेटीत सहभाग नोंदविला. औद्योगिक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया आणि व्यवस्थापन प्रणाली यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना मौल्यवान संधी या भेटीद्वारे प्राप्त झाली.
औद्योगिक परिसरात आगमन झाल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात व्यवस्थापन सदस्य मा. श्री. रंजीत पाटील यांनी कंपनीची ओळख करून देत विपणन आणि उत्पादन प्रक्रिया, संस्थेची कार्यपद्धती, संघटनात्मक रचना तसेच उद्योगातील विविध विभागांची माहिती विद्यार्थ्यांना सविस्तरपणे दिली.
यानंतर महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक आणि कंपनीचे अध्यक्ष मा. श्री. बाळकृष्ण शिंपुकडे यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव, यशस्वी उद्योग उभारणीमागील संघर्ष, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि व्यवस्थापनातील महत्त्वपूर्ण बाबी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.
त्यांचे प्रेरणादायी विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरक व ज्ञानवर्धक ठरले. विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी नवी प्रेरणा आणि आत्मविश्वास या संवादातून मिळाला.
कंपनीचे मानव संसाधन व्यवस्थापक श्री. सचिन पवार यांनी या संपूर्ण औद्योगिक भेटीचे प्रभावी समन्वयन केले. त्यांनी कंपनीमधील दैनंदिन कार्यप्रणाली, मनुष्यबळ व्यवस्थापन, उत्पादन नियोजन, गुणवत्ता नियंत्रण आणि सुरक्षा उपाययोजना याविषयी माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या संकल्पना प्रत्यक्ष उद्योगात कशा राबवल्या जातात, याचे स्पष्ट आकलन झाले.
एम.बी.ए. विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विभागातील सर्व प्राध्यापकांच्या समन्वयातून अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सौ. टी. ए. हिलगे, प्रा. श्री. माणिक पाटील, प्रा. सानिका मिसाळ, प्रा. प्राजक्ता वाघमारे तसेच प्रा. रोनित खराडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) यांनी विशेष परिश्रम घेतले.
या औद्योगिक भेटीच्या आयोजनासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर आणि ॲड. अमित बाडकर तसेच प्राचार्या डॉ. वर्षा व्ही. मेंदर्गी,
प्र. संचालक- एम.बी.ए. डॉ. ताहीर झारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणादायी सहकार्य लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक नियोजनबद्ध, ज्ञानवर्धक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.