D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • एम.बी.ए. विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू सत्र

    एम.बी.ए.  विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू सत्र 
    दिनांक : २७ एप्रिल २०२६
    आयोजक : एम.बी.ए. विभाग, 
    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर
    --------------------------------------एम.बी.ए. विभागाच्या वतीने दि. २७ एप्रिल २०२६ रोजी एम.बी.ए. भाग-II मधील विद्यार्थ्यांसाठी मॉक इंटरव्ह्यू सत्राचे आयोजन करण्यात आले.

    विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील मुलाखत प्रक्रियेची प्रत्यक्ष ओळख करून देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे तसेच नोकरीसाठी आवश्यक असलेल्या संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्यांचा विकास करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

    या कार्यक्रमासाठी उद्योग आणि मुलाखत क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व मा. श्री. उत्तम पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, Jejwalya Techno Pvt. Ltd. यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुलाखतीचे स्वरूप, उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा, उमेदवारांमधील आवश्यक गुण, करिअर घडविण्यासाठी आवश्यक असलेली व्यावसायिक कौशल्ये आणि आधुनिक कॉर्पोरेट जगातील संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

    या मॉक इंटरव्ह्यूसाठी कार्पोरेट क्षेत्राप्रमाणे  मुलाखत पॅनेलची रचना करण्यात आली होती. या पॅनेलने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूंच्या आधारे मूल्यमापन केले. यामध्ये विद्यार्थ्यांचे विषयज्ञान, संवाद कौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता, देहबोली आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचे बारकाईने परीक्षण करण्यात आले.

    या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीचा अनुभव मिळाला तसेच मुलाखतीदरम्यान होणाऱ्या सामान्य चुका, त्यावर मात करण्याचे मार्ग आणि स्वतःला अधिक प्रभावीपणे कसे सादर करावे याबाबत मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. तज्ज्ञांनी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक अभिप्राय देऊन त्यांच्या बलस्थानांची जाणीव करून दिली आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर योग्य दिशा दाखविली.

    विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मुलाखतीच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या सत्रामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून भविष्यातील कॅम्पस प्लेसमेंट, नोकरीच्या मुलाखती आणि व्यावसायिक जीवनासाठी ते अधिक सज्ज झाले.

    हा उपक्रम विभागातील सर्व प्राध्यापकांच्या समन्वयातून अत्यंत यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. सौ. टी. ए. हिलगे, प्रा. श्री. माणिक पाटील, प्रा. सानिका मिसाळ, प्रा. सौ. प्राजक्ता वाघमारे तसेच प्रा. रोनित खराडे (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) यांनी विशेष परिश्रम घेतले. 

     या उपक्रमाच्या आयोजनासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर ॲड. अमित बाडकर तसेच प्राचार्या डॉ. वर्षा व्ही. मेंदर्गी, प्र. संचालक-एम.बी.ए. डॉ. ताहीर झारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणादायी सहकार्य लाभले.