D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Industrial Visit at SUNRISE CANDLES, Mahabaleshwar

    जिद्द, आत्मविश्वास आणि उद्योजकतेचा प्रेरणादायी प्रवास : सनराईज कॅण्डल्स
    दि. ६ मे २०२६ रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी महाबळेश्वर येथील प्रसिद्ध “सनराईज कॅण्डल्स” उद्योगास शैक्षणिक औद्योगिक भेट दिली. विद्यार्थ्यांना उद्योग व्यवस्थापन, उद्योजकता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणे हा या भेटीचा उद्देश होता. “सनराईज कॅण्डल्स”चे संस्थापक श्री. भावेश भाटिया हे दृष्टिहीन असूनही जिद्द, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी हा यशस्वी उद्योग उभारला आहे. त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सातत्य आणि ध्येयाप्रती निष्ठेचे महत्त्व समजले. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मेणबत्त्यांच्या निर्मिती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. उद्योगामध्ये कार्यरत दृष्टिहीन कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास आणि कार्यतत्परता विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी ठरली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्व, टीमवर्क आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व समजले. ही भेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव ठरली. यावेळी एम.बी.ए. विभागातील प्रा. डॉ. सौ. टी. ए. हिलगे आणि प्रा. एम. एस. पाटील हे उपस्थित होते. ही औद्योगिक भेट यशस्वीरीत्या आयोजित करण्यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर आणि ॲड. अमित बाडकर तसेच प्राचार्या डॉ. वर्षा व्ही. मेंदर्गी आणि प्र. संचालक – एम.बी.ए. डॉ. ताहीर झारी यांचे मोलाचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि सहकार्य लाभले.