D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • तंबाखू विरोधी दिन 31.5.26

    कॅन्सर मुक्त भारत बनवण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन टाळणे आवश्यक : उपप्राचार्य कॅप्टन डॉ. आर. एस. नाईक 
     
    देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या  वतीने तंबाखू विरोधी दिन उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आर. एस. नाईक सर उपस्थित होते.
     
    यावेळी डॉ. नाईक यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू सेवनाचे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगितले. त्यांनी तंबाखूमुळे कर्करोग, श्वसनाचे आजार तसेच इतर अनेक शारीरिक समस्यांचा धोका वाढतो, असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनी तंबाखूपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.
    कार्यक्रमास महाविद्यालयातील स्वयंसेवक आणि NCC छात्र  उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ घेतली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ.रजनीताई मगदूम उपाध्यक्ष डॉ.प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य ॲड. वैभव पेडणेकर ॲड. अमित बाडकर प्राचार्या वर्षा मैंदर्गी यांचे मार्गदर्शन लाभले.

    Anti Tobacco Day