देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये क्रांती दिन उत्साहात
कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी आणि नाइट कॉलेजचे प्राचार्य डॉ. उत्तम पाटील यांच्या हस्ते थोर स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक कुमारी प्रेरणा सुतार, ऋषिकेश परीट, आदेश कोठारी आणि राजश्री शेळके यांनी क्रांती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मनोगते व्यक्त केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे त्याग व बलिदान तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणादायी इतिहासातून विद्यार्थ्यांनी देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची मूल्ये आत्मसात करावीत, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अशोक बन्ने, एनएसएसचे स्वयंसेवक तसेच एनसीसीचे छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि देशभक्तिपर वातावरणात संपन्न झाला.
03 Nov, 2026
01 Nov, 2026
22 Oct, 2026
17 Oct, 2026
15 Oct, 2026