कॉमर्सच्या स्वयंसेविकांचे पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन ....
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविकांनी दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन निमित्त लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राख्या बांधून त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.अशोक बन्ने यांनी पोलीस बांधव हे सर्व भगिनींचे रक्षणकर्ते असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे तसेच पोलीस हे आपले मित्र आहेत त्यांच्या बाबतीत कोणतीही भीती न बाळगता त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधा व कोणत्याही अडचणीच्या वेळी त्यांचे मदत घ्या असे प्रतिपादन केले. या उपक्रमाला लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री डॉ. कुबेर दिंडे , डॉ. संतोष गवई यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पीएसआय श्री खाडे, श्री जाधव, श्री बर्गे, श्री बदर्गे, पो. हवालदार दळवी, माने, कोळी, डोंगरे, पाटील, रामाने, नाईक आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
VID-20260828-WA0048