*गणपती मेकिंग वर्कशॉप उत्साहात संपन्न*
कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर, वाणिज्य विभाग आणि विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास या विषया अंतर्गत *" गणपती मेकिंग वर्कशॉप"* घेण्यात आले . कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. वर्षा मैंदर्गी मॅडम यांनी कौशल्य आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना भविष्यकाळात कसे महत्त्वाचे असते या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षिका सौ .अर्चना कुलकर्णी मॅडम यांनी अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने मुलांना गणेश मूर्तीचे प्रशिक्षण दिले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.आर. एस. नाईक सर ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. के. जी. कांबळे सर ,डॉ.बन्ने सर डॉ. राजमाने सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सौ.माधुरी वाडकर मॅडम यांनी केले .या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर, शाडू पासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केल्या.
या कार्यक्रमात आभार डॉ .मुजावर सर यांनी मानले. या कार्यशाळेसाठी सौ. सांगरुळकर मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले. महाविद्यालयातील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
VID-20260901-WA0017