राष्ट्रीय सेवा योजनेच्या 14 स्वयंसेवकांना राजर्षी शाहू सेवा सन्मान पुरस्कार
महाराष्ट्र सोल्जर फोर्स (एम एस एफ) महाराष्ट्र राज्य रेस्क्यू टीम यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन, शासकीय मोहिम अंमलबजावणी करण्यामधील योगदान आणि समाज सेवेवर मधील उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात येणारा राजर्षी शाहू सेवा सन्मान पुरस्कार 2026 देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या खालील 14 स्वयंसेवकांना दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजी श्री शाहू सांस्कृतिक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला-रेवती राजकुमार पाटील, डिंपल मुकेश शर्मा,प्रेरणा कल्लाप्पा सुतार, अमृता सुनील पाटील, नेहा प्रवीण सावंत,सोहम सुखदेव कुंभार, सृष्टी विनायक जिवण, पायल अमर कांबळे, निसर्ग प्रल्हाद सावंत, प्रज्वल प्रकाश कदम, श्रीपाद बाबुराव खरसे, सायली शशिकांत करांडे, समीक्षा शीतलकुमार धांग, सानिका श्रीकांत चौगले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ वर्षा मैंदर्गी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा दिनाच्या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. (डॉ.) अशोक बन्ने प्राध्यापक कुबेर दिंडे प्रा. सौ जगताप आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Certificates Awards