D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा 24.9.26

     
    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये  राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा 
    दिनांक 24 सप्टेंबर हा दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील अतिशय उत्साहाने साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना घेताना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ वर्षा मैंदर्गी यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व विशद करताना राष्ट्रीय सेवा योजनेमधील कार्य हे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण, सामाजिक भान आणि देशसेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी स्वयंसेवक उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त करताना राष्ट्रीय सेवा योजनेमधील सहभागामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक बदल घडू शकतात त्याचे स्वअनुभव कथन केले. या कार्यक्रम प्रसंगी राजश्री शाहू सेवा सन्मान पुरस्कार प्राप्त स्वयंसेवकांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच माझी स्वयंसेवकांचा सत्कार आजी स्वयंसेवकांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. (डॉ.) अशोक बन्ने प्राध्यापक कुबेर दिंडे प्रा. सौ जगताप आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.