D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • नेत्र तपासणी शिबिर 28.9.2026

    कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एककाकडून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन 
    सोमवार दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज कॉमर्स, कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि नंदादीप आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सौ वर्षा मैंदर्गी  यांच्या हस्ते आणि उपप्राचार्य डॉ. रवीकुमार नाईक यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी    राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. (डॉ.) अशोक बन्ने प्रा. कुबेर दिंडे, प्रा. डॉ . कुमार कांबळे, डॉ. एस. एस. देसाई, डॉ. सौ. एस. ए. चौगुले यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, 125 हून अधिक विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिबिराचा लाभ घेतला.