D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • मानसिक आरोग्य आणि एच आय व्ही जाणीव जागृती व संवेदीकरण कार्यशाळा 30.9.26 रेड रिबन क्लब

    कॉमर्स कॉलेजमध्ये एनएसएस व रेड रिबन क्लब मार्फत मानसिक आरोग्य आणि एच. आय. व्ही.  जाणीव जागृती व संवेदीकरण कार्यशाळा संपन्न 
    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने "मानसिक आरोग्य आणि एच. आय. व्ही.  जाणीव जागृती व संवेदीकरण" कार्यशाळा दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील समुपदेशक श्री अभिजीत रोटे यांनी उपस्थितांना मानसिक आरोग्य याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच एच.आय.व्ही. एड्समुळे पेशंट, कुटुंब आणि समाज यावर होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. एड्स होण्याची कारणे तसेच त्याच्यावर उपाय योजना यावर सुद्धा श्री रोटे यांनी भाष्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स वर्षा मैंदर्गी होत्या. प्राचार्या डॉ. सौ. वर्षा मैंदर्गी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये  विद्यार्थीदशेमध्ये असतानाच एड्स विषयी जागृत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अशोक बन्ने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कुबेर दिंडे यांनी केले. कार्यशाळेला १०० होऊन अधिक विद्यार्थी आणि स्वयंसेवक उपस्थित होते.