युवक युवतींनी मतदार नोंदणी करून लोकशाही बळकट करावी: उपायुक्त परितोष कंकाळदिनांक 8 ऑक्टोबर 2026 रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नव मतदार नोंदणी शिबिर; आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी श्री परितोष कंकाळ यांनी विद्यार्थ्यांना वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदार म्हणून नोंदणी करून लोकशाहीचा पाया बळकट करावा असे प्रतिपादन श्री कंकाळ यांनी केले अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वर्षा मैंदर्गी; यांनी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी सर्वप्रथम मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असून आपल्या मतदानाचा हक्क अत्यंत सुज्ञपणे आणि जबाबदारीने बजावावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. (डॉ.) अशोक बन्ने यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष गवई यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर दिंडे यांनी केले. यावेळी मतदार नोंदणी समन्वयक सागर सारंग, तुषार पवार समशेर रजपूत आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली.
https://www.instagram.com/reel/DeQlkBXoqqm/?vrfl=Z3QwbWwwNnQ3N2pq
VID-20261009-WA0010
03 Nov, 2026
01 Nov, 2026
22 Oct, 2026
17 Oct, 2026
15 Oct, 2026