D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ६२ व्या वार्षिक पारितोषिक समारंभामध्ये डॉ. ताहीर सलीम झारी "आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित .

    कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या ६२ व्या वार्षिक पारितोषिक समारंभामध्ये  डॉ. ताहीर सलीम झारी यांना "आदर्श शिक्षक " पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. झारी यांनी दोन दशकांपासून कष्टाने आणि  सातत्यपूर्ण प्रेरणादायी कार्याने व आपल्या सकारात्मक विचारांनी  शिक्षण क्षेत्रामध्ये  प्रभावी मानदंड निर्माण केला आहे. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमताच हा गौरवपूर्ण पुरस्कार डॉ. ताहीर झारी यांना देण्यात आला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम  या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिका प्रशासक आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, भा. प्र. से. यांची प्रमुख उपस्थिती होती.  उपाध्यक्ष डॉ. प्रसाद वि. मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य  ॲड. वैभव पेडणेकर, ॲड. अमित बाडकर, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयातील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.