D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये आकाश कंदील मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

    कॉमर्स कॉलेजमध्ये आकाश कंदील मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
    विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच इतर उपक्रमांची आवड निर्माण व्हावी व ते स्वावलंबी बनावेत यासाठी दीपावली निमित्त कॉमर्स कॉलेजमध्ये आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आकाश कंदील मेकिंग कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सकाळचे वार्ताहार श्री सुयोग घाडगे यांना आमंत्रित करण्यात आले.त्यांनी आपल्या पत्रकारिते बरोबरच आकाश कंदील बनवण्याची आपली कला अतिशय उत्तमरीत्या जोपासली आहे. त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने मुलांना सुबक व आकर्षक आकाश कंदील कसा बनवावा याविषयी अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनियर विभाग प्रमुख श्री बी. डी. डवंग होते.  कार्यक्रमाची प्रस्तावना  टी .एस. चौगुले यांनी केली. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक ,विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विशेष सहभाग नोंदविला.