D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • भाषा विभागातर्फे "वाचन प्रेरणा दिन" साजरा

    कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मधील भाषा विभागातर्फे "वाचन प्रेरणा दिनानिमित्त" डॉक्टर सुनील कुमार लवटे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील सर होते. कार्यक्रमाची प्रस्तावना भाषा विभागाचे प्रमुख डॉ. इब्राहिम मुल्लानी तर आभार प्रदर्शन डॉ. संजय चोपडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रुती काशीद यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.