D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Panchpran Oath Under "Meri Mitti Mera Desh" Campaign on 09/08/2023

    "मेरी मिट्टी मेरा देश" या अभियानांतर्गत 'पंचप्रण शपथ'

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शासनाच्या "मेरी मिट्टी मेरा देश" या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ  बुधवार दि. ०९/०८/२०२३ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी प्रथम मेरी मिट्टी मेरा देश आणि पंचप्रण शपथ या अभियानाविषयी उद्बोधन केले. आपल्या देशाचे  २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचे स्वप्न साकार होण्याकरिता विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे त्यानी आवाहन केले. त्यानंतर स्वयंसेवक आणि शिक्षकांना पंचप्रण शपथ घ्यावयास सूचित केले. सदर उपक्रमाचे आयोजन शासन, शिवाजी विद्यापीठाच्या सुचना आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. एस. बन्ने आणि स्वयंसेवकांनी केले. या उपक्रमाकरिता महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक आणि प्रा. पी. एम. सोरटे यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी  राष्ट्रीय सेवा योजनेचे ९६  स्वयंसेवका उपस्थित होते.

    Photo