D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांचे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि कर्मवीरांना अभिवादन 04/11/2023

    कॉमर्स कॉलेजच्या एन.एस.एस. स्वयंसेवकांचे रत्नाप्पा कुंभार आणि कर्मवीरांना अभिवादन

    देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रविवार दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी निमशिरगाव येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी शिक्षण घेतलेल्या कुमार विद्यामंदिर या शाळेला भेट देऊन थोर स्वातंत्र्य सेनानी, शैक्षणिक, सामाजिक कार्याचे शिरोमणी पद्मश्री  देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना अभिवादन केले.  प्रा. नंदकुमार कुंभार आणि प्रा. शांताराम कांबळे यांनी रत्नाप्पाण्णांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याविषयी स्वयंसेवकांना माहिती दिली.

    त्यानंतर स्वयंसेवकांनी कुंभोज येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जन्मस्थळी असणाऱ्या स्मारकास भेट देऊन कर्मवीरांना  अभिवादन केले. रयत गुरुकुल चे मुख्याध्यापक श्री सागर माने सर यांनी स्वयंसेवकांना कर्मवीरांच्या कार्याविषयी डॉक्युमेंटरी द्वारे माहिती दिली. तसेच कर्मवीरांच्या नावे उभारलेल्या म्युझियमला भेट देऊन त्यांच्याविषयी स्वयंसेवकांनी माहिती घेतली. या दोन्हीही भेटी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असे प्रतिपादन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी केले. यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने, निम शिरगावच्या सरपंच सौ अश्विनी गुरव, उपसरपंच श्री रोहित लोहार, श्री देवळापूरकर, डॉ. बृहस्पती शिंदे, प्रा. शांताराम कांबळे, श्री अमित पाटील  इ. उपस्थित होते.

    111