D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • एन.एस.एस. विभागाकडून संविधान दिन साजरा दि. २६ नोव्हेंबर २०२३

    कॉमर्स कॉलेजच्या एन.एस.एस. विभागाकडून   दि. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिन उत्सासाहात साजरा 

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रविवार दिनांक २६ नोव्हेंबर 2023 रोजी विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा केला. सुरुवातीस महाविद्यायालयामध्ये स्वयंसेवकांनी डॉ. ए. एस. बन्ने यांच्यासह संविधानाच्या 'उद्देशिकेचे'  सामुहिक वाचन केले. यावेळी डॉ. बन्ने यांनी भारतीय संविधान आणि संविधान दिन याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नर्सिंग कॉलेजच्या डॉ. स्नेहल मगदूम उपस्थित होत्या.

    त्यानंतर स्वयंसेवकांनी सूळकुड ता. कागल येथील लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल आणि ज्यू. कॉलेज या ठिकाणी भेट दिली.  या ठिकाणी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत संविधान दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.  सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशभक्त डॉ. रत्नाप्पा कुंभार यांना अभिवादन करण्यात आले.   मुख्याध्यापक श्री स्वामी सर (संविधान संवादक) यांनी स्वयंसेवकांना संविधानाची उद्देशिका, त्यामधील प्रत्येक शब्द, त्यांचा अर्थ, महत्व याविषयी मार्गदर्शन केले. त्याबरोबरच  संविधान दिनानिमित्त आयोजित पोस्टर प्रदर्शनास भेट देऊन संविधानाविषयी स्वयंसेवकांनी माहिती घेतली. यानंतर शाळेचे विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत  सूळकुड गावामधून रॅलीचे आयोजन करण्यात आले.    संविधान दिनानिमित्त मगदूम एन्डोस्कोपी हॉस्पिटल, कोल्हापूर  आयोजित आरोग्य शिबिराचा स्वयंसेवकांनी लाभ घेतला.  कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले . 

    सदर कार्यक्रमाकरिता कौन्सिल  ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील  यांचे प्रोत्साहन आणि मौल्यवान मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक बन्ने, लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल आणि ज्यू. कॉलेजचे मुख्याध्यापक श्री स्वामी सर, खोत सर, नर्सिंग कॉलेजच्या स्नेहल  मगदूम  आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    Video Rally