<p>नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिनांक एक जानेवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सहयोगाने कोल्हापूर शहरातील थोर व्यक्तींचे पुतळे स्वच्छ करण्याची मोहीम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पाडली. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील बिंदू चौकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धपुतळे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, महानगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा इत्यादींची स्वच्छता करण्यात आली</p>
02 May, 2024
01 May, 2024
29 Apr, 2024
14 Apr, 2024
12 Apr, 2024
29 Mar, 2024