इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (आयडीबीआय बँक) मध्ये "ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर" पदासाठी झालेल्या परीक्षेमध्ये एम. बी. ए. विभागामधील "श्री. शुभम संजय विभुते" या विद्यार्थ्यांची लेखी व मौखिक परीक्षेद्वारे "ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर" या पदासाठी निवड झाली असून सर्व स्तरावरती त्याच्या यशाचे कौतुक होत आहे. यावेळी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, प्र. संचालक डॉ. ताहीर स. झारी, अधीक्षक श्री.व्ही.जी.काळे आणि इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.