D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • आंतरराष्ट्रीय वेबिणारचे उदघाटन

    शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व देशभक्त रात्न्नाप्पा कुंभार कॉलेज आणि कोल्हापूर जिल्हा बास्केटबॉल संघटना

    यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिणारचे उदघाटन ऑनलाइन माध्यमाद्वारे करण्यात आले.  या वेळी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. विलास नादवडेकर, कौन्सिल ऑफ एजुकेशनच्या अधाक्ष्या सौ. रजनीताई मगदूम, डॉ. विश्वनाथ मगदूम, अॅड. व्ही. एन. पाटील,  अॅड. वैभव पेडणेकर, श्री. नितीन दळवाई तसेच ऑलीपिक खेळाडू वीरधवल खाडे उपस्थित होते.

    याबरोबरच आंतरराष्ट्रीय पाहुणे सर्बिया या देशातून डॉ. गॉर्डना मार्कोविक, डॉ. ब्रान्को सिसिक, लेबानान मधून वालीद मार्सेल, फिलीपेनसहून बॉन्ग पास्कुअल, डॉ. संदीप देवल व संग्राम चौगुले यांनी ऑनलाइन ( लाईव) संदेश दिले.

    पहिल्या सत्रामध्ये डॉ. संदीप देवल यांनी “सर्वासाठी आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती” आणि डॉ. गॉर्डना मार्कोविक- सर्बिया यांनी “स्त्रियांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती” या विषयावर विस्तृत विवेचन केले.

    दि. ६ जुलै २०२० रोजी ठीक ४ वाजता वेबिणार सुरु होईल असे संयोजकांनी कळविले आहे.

    यावेळी प्र. संचालक शिवाजी विद्यापीठ- डॉ. पी.टी गायकवाड, देशभक्त रात्न्नाप्पा कुंभार कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, वेबिनारचे समन्वयक डॉ. शरद बनसोडे, डॉ.अशोक बन्ने, श्री. सुचय खोपडे, डॉ.के.जी. कांबळे, डॉ.एन. एच. जाधव, श्री. विनायक साळोखे , डॉ.सुष्मा चौगुले, सौ. टी.ए. हिलगे, श्री. प्रवीण साळवी इ. नी उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन केले.