D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • उच्चमाध्यमिक (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये महाविद्यालयाचे घवघवीत यश!

    उच्च माध्यमिक (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षेत देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स चे घवघवीत यश!


     उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च 2020 या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल 98.34 टक्के व  एमसीव्हीसी विभागाचा निकाल 100% इतका उच्चांकी लागलेला असून या परीक्षेत कु. परुळेकर जान्हवी समीर हिने 650 पैकी 613 (94.31%) गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला तर प्रत्येकी 603 (92 . 77 %) गुण मिळवून कु. काटकर सुष्मिता सूर्यकांत व  कु. समीक्षा शरद यांनी द्वितीय तर 602 (92.67%) गुण मिळवून कदम सन्मय संदेश याने तृतीय क्रमांक मिळविला. या परीक्षेसाठी बसलेल्या एकूण 603 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केले. तसेच 176 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले आणि 284 विद्यार्थी 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले. श्री कदम सन्मय संदेश याने बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी आणि माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विषयात शंभर पैकी शंभर गुण संपादन केले. तसेच एम सी व्ही सी या विभागातून कु. वैष्णवी चौगुले हिने 90% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

    सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कौन्सिल ऑफ एज्युकेशन च्या अध्यक्षा सौ रजनीताई मगदूम, मा. उपाध्यक्ष प्रसाद कामत, मा. सचिव ॲड. व्हीं एन पाटील, सदस्य डॉ. विश्वनाथ मगदूम व ॲड. वैभव पेडणेकर, आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि ए पाटील तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन!