D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Distribution of consumables to needed flood affected families in Kolhapur by by *Social Activity Group* batch 1988.

    स्वराज्य1लाईव्ह ▼ Sunday, August 9, 2020 कॉलेज ऑफ कॉमर्स बॅच १९८८ चे उल्लेखनीय कार्य कॉलेज ऑफ कॉमर्स बॅच १९८८ चे उल्लेखनीय कार्य मुबारक आत्तार । कोल्हापूर   कॉलेज ऑफ कॉमर्स बॅच १९८८ तर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना  संकटग्रस्त, सिने तंत्रज्ञ, कलाकार व कर्मचारी वर्ग यांना सोशल अँक्टिविटी फंडातून जीवनावश्यक धान्य वस्तू वाटप कार्यक्रम कॉलेजच्या प्रांगणात दि. ९ ऑगस्ट, २०२० रोजी सकाळी ११ वाजता संस्थेचे सेक्रेटरी अँड. श्री व्ही.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. त्यावेळी सदर फंडाचे सक्रिय सभासद होते. यावेळी 200 कामगार, तंत्रज्ञ व कलाकार याना धान्य किट वाटप केले. यावेळी कार्यक्रम टप्प्याटप्प्याने घेण्यात आला व कार्यक्रमाच्या ठिकाणी थर्मल चेक व सॅनिटायझर ची सोय केली होती.               विद्यार्थी कॉलेज शिकतात व निघून जातात परंतु मैत्री ही कायम राहते कारण कॉमर्स कॉलेज चे १९८८ च्या बॅचने हे दाखवून दिले आहे. यांचे कार्य हे अत्यंत उल्लेखनीय आहे.या बॅचने सोशल अॅक्टिव्हिटीज द्वारे असे कार्य करणार असल्याचे व या अॅक्टिव्हिटीज मधील हा पहिला टप्पा असल्याचे  अभिनेते महादेव साळुंखे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.              यावेळी उपस्थित राजेश साबणे,संजय रोटे, विजय परमणे, विजय गायकवाड, आनंद शिंदे, जयप्रकाश वर्दन, शामल चौगुले, संजय माने, सुषमा ठाकूर, फिरोज बागवान, राजू अंकलीकर, नितीन कुलकर्णी अतुल साळोखे व नंदन कुलकर्णी उपस्थित होते.              अभिनेते महादेव साळोखे यांनी सर्वांचे आभार मानले. या बॅचशी विशेष संपर्क व प्रयत्न महादेव साळोखे व सुषमा ठाकूर यांनी केले. स्व. डॉ. दिनकरराव साळोखे नर्सिंग ब्युरो तर्फ स्टाफला ओर्सनिक अल्बम 30 गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.