D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • ‘कॉमर्स कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर कार्यशाळा’

    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये वाणिज्य विभागा मार्फत शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत   दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ वर कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख वक्ते डॉ. आर. जी. कोरबू,  डॉ. प्रकाश कुंभार आणि प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर मांडणी केली.

    कार्यशाळेचे उद्घाटन कौन्सिल ऑफ एजुकेशन चे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांचे हस्ते व डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टरचे समन्वयक श्री. टी. एल. कांबळे यांचे उपस्थितीत झाले. प्रा. डॉ. के. जी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले व कार्यशाळा आयोजित करण्याचा हेतू सांगितला. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. मगदूम यांनी सर्व घटकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० कडे सकारात्मक दृष्टीने पाहावे असे प्रतिपादन केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

    पहिल्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते डॉ. आर. जी. कोरबू डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, कोल्हापूर यांनी Academic Bank of Credits या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     

    दुसरया सत्रामध्ये म. ह. शिंदे महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश कुंभार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि उच्च शिक्षणामधील आव्हाने यावर विवेचन केले.

    तिसऱ्या सत्रामध्ये प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा विध्यार्थी. शिक्षक, समाज आणि शैक्षणिक संस्था यांच्यावर होणारे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम यावर मार्गदर्शन केले.

    चौथ्या सत्रामध्ये उपस्थितांच्या शंका व प्रश्नांचे  डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. आर. जी. कोरबू, प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी  निरसन केले.  वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. के. जी. कांबळे यांनी कार्यशाळेचा आढावा घेतला उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. के. जी. कांबळे,  डॉ. ए. एस. बन्ने डॉ. एस. बी. राजमाने,  सौ. एम. एस. वाडकर, सौ. समीक्षा मुथाने, श्री. एम. एन. मुजावर, श्री. के. एम. टोपरानी  व श्रीमती सुरेखा पाटील  यांनी केले.‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. कॉम. भाग दोन मधील विद्यार्थीनी कु. प्रतीक्षा पाटील हिने केले.या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील १४० पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

    news Punyanagari 12-02-23