D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • दे .भ.रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शिक्षक पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

    "आई वडील हे पहिले शिक्षक आणि शिक्षक हे दुसरे आई-वडील"या आपल्या भारतीय संस्कृतीनुसार पालक शिक्षक समन्वयातून मुलांमध्ये परिवर्तन घडवून सक्षम, जबाबदार, सामाजिक भान असणारी आणि संस्कारांच्या शिदोरीवर संस्कृतीचे जतन करणारी पिढी निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही ए पाटील. शिक्षक पालक सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरून केले . शिक्षक -पालक समन्वयातूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे तसेच पालक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत आणि ती आपण कशाप्रकारे बजावली पाहिजेत याचे उत्तम मार्गदर्शन ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. श्री बी.डी.डवंग  यांनी केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका याविषयी प्रा. श्री एम.पी वंडकर  यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. प्रा. सौ टी एस चौगुले यांनी परीक्षा व मूल्यमापन पद्धती याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे  संयोजन प्रा. सौ ए. व्ही पाटील पाटील  यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. सौ जी.एन. धुमाळ यांनी केले.  आभार प्रदर्शन ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. श्री बी.डी.डवंग यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.