D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • युवक व्यसनापासून अलिप्त राहीले तरच देश महासत्ता होईल

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे मार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्व अभियान साजरे करण्यात येत आहे. सदर पर्वामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक 17.04.2023 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कोल्हापूर कार्यालय व देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या कडील समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले. सदर व्याख्यानाकरिता प्रसिद्ध हास्यसम्राट व प्रबोधनकार संभाजी यादव यांनी आपल्या सहज, सरळ, सोप्या भाषेमध्ये तसेच विद्यार्थ्यांना कळेल अशा विनोदी शैलीतून व्यसनाचे घातक परिणाम सांगितले. त्याचबरोबर एकविसाव्या शतकामध्ये देशाला महासत्ता करण्यासाठी युवकांचा असलेला सहभाग व त्या दृष्टिकोनातून युवकांनी करावयाच्या बाबींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .

    समान संधी केद्राच्या वतीने मागासवगर्गीय विद्यार्थ्याना विविध शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जात आहे. तसेच महाविद्याालयामधील शेवटच्या विद्यर्थी या योजनांशी संलग्न होईल याकरीता आमचे महाविद्यालय कटीबध्द असेल व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल असे प्रतिपादन डॉ.व्ही.ए.पाटील, प्राचार्य, देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर यांनी या प्रसंगी केले.

    सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा. श्री विशाल लोंढे सहायक आयुक्त, समाजकल्याण,कोल्हापूर यांनी सांगितले की सामाजकि न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय पर्व अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयेाजन या कर्यालयामार्फत केले असून आपल्या महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती या विषयावरती विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे तसेच विविध स्पर्धा परिक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करून घेण्याचे व्यसन लावून घ्यावे व आयुष्यामध्ये यशस्वी व्हावे.

    सदर कार्यक्रमा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी एस पाटील निरीक्षक, समाज कल्याण कोल्हापूर व आभार श्री. सचिन कांबळे तालुका समन्वयक समाज कल्याण कोल्हापूर यांनी केले व सहायक आयुक्त्‍ कडील श्रीमती.कल्पना पाटील , समाजकल्याण ‍ निरीक्षक, निलम गायकवाड, उपप्राचार्य श्री.डवंग, श्री.खराडे व कार्यालायीन व महाविद्यालयीन कर्मचारी तसेच 500 विद्यार्थी उपस्थित होते.