D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • INTERNATIONAL CONFERENCE

  INTERNATIONAL CONFERENCE (BELENDED MODE) ON ADVANCES IN COMMERCE, MANAGEMENT,  SOCIAL SCIENCES AND HUMANITIES : A  MULTIDISCIPLINARY APPROACH 

  ORGANIZED BY IQAC AND DEPARTMENT OF COMMERCE 

  देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न 

  देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज कॉमर्स, कोल्हापूर  येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ४ मे २०२३ रोजी “ वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र आणि मानव्यशास्त्र यातील आधुनिक विचार: एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन”  या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.
  सदर परिषदेचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए. पाटील यांच्या प्रस्तावनेने झाला, यामध्ये प्राचार्यांनी महाविद्यालयाची उपस्थितांना थोडक्यात ओळख करून दिली, तसेच परिषदेच्या आयोजनामागील उद्देश विशद केला. परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संशोधन क्षेत्र यांची सांगड घालून संशोधकांनी आपले ज्ञान अद्ययावत करावे असा विचार मांडला.  सदर परिषदेची सुरुवात  परिषदेचे प्रमुख अतिथी वक्ते ओबेदुल्लाह,  अफगाणिस्तान यांच्या “  भागधारकांची सक्रियता आणि शाश्वतता” या विषयावरील शोधनिबंधाच्या सादरीकरणाने झाली.  यानंतर परिषदेचे बीजभाषक डॉ. परशराम पाटील यांनी “कृषी क्षेत्राची सद्यस्थिती आणि निर्यात संधी” या विषयावरील आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले. परिषदेच्या प्रथम सत्रात प्रो. डॉ. एस बी आकाश (राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव)  आणि द्वितीय सत्रात प्रो. डॉ. नामदेव गवस ( गोवा विद्यापीठ, गोवा)  यांनी आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले तसेच संशोधकांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या तांत्रिक आणि शोधनिबंध सादरीकरण सत्रात परिषदेला ऑनलाईन व ऑफलाईन मार्गाने उपस्थित असणाऱ्या अध्यापक वर्ग व संशोधकांनी आपापल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. सदर परिषदेचा समारोप शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.एस महाजन यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाला.  
  आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम  तसेच कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे इतर सदस्य आणि संस्थेचे प्राचार्य डॉ. व्ही ए पाटील यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लागले. सदर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी  महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ.के.जी.कांबळे तसेच वाणिज्य विभागात कार्यरत प्रा. डॉ.ए.एस. बन्ने आणि आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. डॉ. एस.बी.राजमाने  यांनी विशेष कष्ट घेतले यामध्ये त्यांना महाविद्यालयातील इतर अध्यापक व कर्मचारी वर्ग यांचे सहाय्य लाभले.

  news