D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • CA Foundation Course Batch Inaugural Ceremony

    देशभक्त रत्नप्पा कुंभार कॉलेजऑफकॉमर्स कोल्हापूर येथे दिनांक 28 जुलै 2023 रोजी सीए फाउंडेशन कोर्स प्रशिक्षण बॅच चे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि कोल्हापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री. सुनील नागावकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट सुनील नागावकर यांनी चार्टर्ड अकाउंटंट कोर्स संदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता विद्यार्थी व्हावे असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या व मे 2023 मधील चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होऊन चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्री सुनील नागावकर तसेच कौन्सिलऑफ एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते करण्यातआला. याप्रसंगी सण २०२३-२४ मधील सीए फाउंडेशन कोर्स बॅच साठीच्या अध्यायावत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांच्या हस्ते करण्यातआले. सदर प्रसंगी संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनी सदर पायाभूत सुविधांचा लाभ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.ए.पाटील उपप्राचार्य डॉ. आर एस नाईक तसेच माजी प्राध्यापक बी टी नाईक, सीए फाउंडेशन कोर्सेचे समन्वयक डॉ. एस. एफ. बोथीकर, सह समन्वयक प्रा. के.सी. जोशी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका अश्विनी मगदूम यांनी केले, तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एम .मुजावर आणि प्रा. समीना जमादार यांनी विशेष कष्ट घेतले. कौन्सिलऑफ एज्युकेशन संस्थेच्या अध्यक्ष माननीय सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉक्टर प्रसाद मगदूम, तसेच संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन सदर कार्यक्रमासाठी लाभले.